दिग्दर्शन, संवाद लेखन, अभिनय यांचं उत्तुंग दर्शन म्हणजे प्रतिमाजींचा "आम्ही दोघी " सिनेमा.सबंध सिनेमा संपेपर्यंत आम्ही उठलो नाही, की कुणाशी बोललो नाही..प्रिया, मुक्ता, भूषण, करमरकर, यांचा अभिनय शब्दातीत..बंड करून श्रद्धा आणि सबूरी दोन्ही नसण्याचा आव आणणारी, पण उद्धटपणावर न जाणारी, प्रिया बापट, समजूतदार भूषण आणि खालच्या पट्टीत मोजकं बोलणारी मुक्ता, यांच्यामुळे हा सिनेमा भावनिक मनोव्यापारावरचा की एका शालेय मुलीची, ते पाहत बसावं असाच आहे..धन्यवाद ..