चित्रपट पाहिला.
चित्रपटात खूप चुका आहेत. नक्की काय चालू आहे चित्रपटात ते काहीच कळत नाही. गणेशच्या मनाचा थांग लागत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना बोअरिंग वाटते. गणेश आणि गीताचं नातं सुरुवातीपासून दाखवलं असतं तर ते डेव्हलप करायला व्यवस्थित वाव होता. त्यांची ओळख, मैत्रिपासून प्रेमापर्यंतचा प्रवास छानपणे उलगडून दाखवता आला असता. पण त्या दोघांमधले संवाद पण व्यवस्थित नव्हते. त्या दोघांमध्ये नक्की काय चालू आहे तेच कळत नाही.
हवालदार कदमची समस्या अर्धवट सोडलीत. त्याचा उपयोग फक्त इन्स्पेक्टर पवारांची मनोभूमिका बदलण्यासाठी केला गेला. हे खटकलं. बाकी शेवट तर एकदम बकवास. गणेशला कमीतकमी मरून न देता हॉस्पिटलमधून बरा होऊन त्याच्या आईची भेट दाखवली असती तर शेवट अधिक गोड आणि सुखावह झाला असता. त्या गणेश ला मारून नक्की काय साध्य केलंत तुम्ही ते नाही कळलं
कलाकृती बनवण्याच्या नावाखाली जर तुम्ही दिग्दर्शक असं समजत असाल की कसा पण चित्रपट बनवू आणि लोकांच्या डोक्यावर मारू तर हा तुमचा भ्रम आहे. प्रेक्षक चित्रपट का पाहतो, हे लेखक आणि दिग्दर्शकाने आधी समजून घ्यावे. शेवट जर सुखाचा नसेल तर चित्रपटाची जागा प्रेक्षकांसाठी कचऱ्याची पेटी असते हे लक्षात ठेवावे.