कथा आपल्याला माहीत आहेच.त्यात खूप खोटा कथाभाग मिसळून हिंदी फिल्म स्टाईल चित्रपट बनवला आहे. बाकी सगळे कलाकार, भव्य सेटस्, अभिनय, फोटोग्राफी, कॅमेरा ट्रिक्स, यात कुठेही कमी पडत नाही.उदयभान राठौड हा कडवा राजपूत ,शंकरभक्त होता असे इतिहास सांगतो. इथे त्याला पक्का मुसलमान टच दिला आहे.सूर्याजी मालुसरे, शेलारमामा यांना फारसा उठाव नाही.युद्धातली त्यांची कामगिरी नगण्य दाखविली आहे. शेवटी मूळ कथेत बदल झाला आहे. महाराज येईपर्यंत तानाजी जिवंत होता.त्याने उदयभान ला तोफेला बांधून ती तोफ सिंहगडावरून खाली ढकलून दिली असे दाखवले आहे. तरीही एकदा तरी पहावा , तानाजीच्या शौर्यासाठी.