रामाचार्य आणि सुमुख या दोन पात्रांचा संदर्भ श्री स्वामी समर्थ चरित्रात कुठून मिळाला हे निर्माता / दिग्दर्शक / पटकथाकार यांनी कृपया सांगावं. यांचा उल्लेख माझ्या वाचनात / ऐकण्यात या मालिकेपूर्वी कधी आलानव्हता.
या दोन पात्रांना या मालिकेत देण्यात आलेलं फुटेज मालिकेत नाट्यमयता आणण्यासाठी उपयोगी पडत असेल कदाचित परंतु हे अनावश्यक वाटतं.
या दोन पात्रांना दिलेलं फुटेज लवकरात लवकर कमी करावं आणि स्वामी चरित्राचं अधिक realistic चित्रण दर्शकांना आणि भक्तांना पहायला मिळावं असं मला वाटतं.
या दोन पात्रांना अवास्तव फुटेज देण्यामागे कांय हेतू आहे हे स्पष्ट होणं आवश्यक आहे.
कधीही नं वाचलेली किंवा ऐकलेली पात्र या मालिकेत दाखवून एक प्रकारे श्री स्वामी समर्थ आणि भक्तगण यांच्याशी प्रतारणा होतेय असं माझं स्पष्ट मत आहे. या प्रकाराला लवकरात लवकर आवर घालणं आवश्यक आहे.