अशक्य...केवळ अशक्य टाईमपास आहे हा, सिनेमा! प्रियदर्शन जाधव ने कमाल केली आहे!
जितू जोशी, हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी धुमाकुळ घातलाय! टाईमिंग अफलातून आहे ह्या लोकांचं. आणि चक्क चक्क अनिकेत विश्वासरावने एकदम वेगळंच कॅरॅक्टर उभं केलंय. अर्थात ती सगळी प्रियदर्शन जाधवची कमाल आहे. त्याने अनिकेतला प्रत्यक्षात सीन करून दाखवला असणार. पण पोरानं काॅपी मस्त केलीये. किर्ती पेडणेकर आणि अमृता खानविलकर पण मस्तच!
एकंदरीत निखळ मनोरंजन, फक्त ज..रा चावट!