sangeet devbabhali : गेली चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' या भद्रकाली प्रोडक्शनच्या नाटकाने अनेक विक्रम रचले. अगदी गल्ली पाहून ते दिल्ली पर्यंत, शाळा, कॉलेज, ते अगदी साहित्य अकादमी पर्यंत या नाटकाने मजल मारली. केवळ मराठीच नाही तर बहुभाषिक नाट्य वेड्या रसिकांनाही या नाटकाने भावविवश केले. अशा 'संगीत देवबाभळी' या नाटकाबाबत नुकतीच एक महत्वाची घोषणा भद्रकाली प्रोडक्शनने केली आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता शेवटचे काही प्रयोग सादर होणार आहेत.
दिनांक आठ ऑक्टोबर 2023 रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन मध्ये देवबाभळी या नाटकाचे रविवारी सलग पाच प्रयोग होणार आहेत सकाळी साडेसात पासून प्रयोगाला सुरुवात होईल त्यानंतर 11, दुपारी चार, संध्याकाळी सात, आणि रात्री साडेनऊ वाजता शेवटचा प्रयोग असेल हा एक विश्वविक्रमच म्हणावा लागेल आणि या विश्वविक्रमाचा एक साक्षीदार म्हणून मी सतीश भालेराव गुगल लोकल गाईड लेवल आठ, आपल्याला हा व्हिडिओ अपलोड करून देत आहे ज्यामध्ये सर्व पाचही प्रयोगाचे पोस्टर्स दिसतील आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाटकातल्या प्रमुख पात्रांचा असलेला कट आउट फोटो पण दिलेला आहे यानंतर हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या दुःखद भावनेसह आणि सलग पाच प्रयोग होणार या अभिमानासह कलाकारांना शुभेच्छा देऊन आपण हा अभिप्राय वाचला त्याबद्दल धन्यवाद