महाराष्ट्राची हस्याजत्रा हा एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे सर्वच कलाकार अतिशय उत्तम काम करतात पण आज रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर केलेल्या एपिसोड मधे पृथ्वीक प्रताप याला साडी घातलेली आहे ..अधेमधे प्रभाकर मोरे यांनाही स्त्रिपत्र दाखविले जाते खरेच सांगतो ते अत्यंत बीभत्स दिसते ....या कार्यक्रमाचा स्वतःचा एक प्रेक्षकवर्ग आहे जो यातील सर्व कलाकारांचे व कंटेंट लेखकांचे फार कौतुक करतो ...मला वाटते विनोद निर्मितीसाठी असले बीभत्स प्रकार करण्याची अजिबात गरज नाही ...निर्माते ..दिग्दर्शकांनी याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा "चला हवा येऊ द्या " या कार्यक्रमाचा जसा बोजवारा उडाला आहे तशी पाळी येऊ शकते ...
एक सुजाण प्रेक्षक म्हणून केलेली ही सूचना आहे ....