' वीर सावरकर ' हा रणदीप हुड्डा यांचा सिनेमा अत्यंत प्रभावी, मनाची पकड घेणारा आणि अस्वस्थ करुन सोडणारा सिनेमा आहे. इतिहासाचे नेमके वास्तविक सादरीकरण करून हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय आहे ? हे पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत सक्षमपणे पोचविण्याचे काम त्यांनीं या सिनेमाद्वारे केलें आहे. Hats off to you Randeep! वीर सावरकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण सिनेमा काढण्याचे शिवधनुष्य सशक्त उत्तम पेलल्याबद्दल रणदीप हुड्डा यांचे खूप अभिनंदन आणि त्यांना शतशः नमन. सावकारांच्या आयुष्यातील काळीज हेलावून टाकणारे, हृदय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग रणदीप यांनी अभिनयाने, उत्तम दिग्दर्शनाने जीवंत उभे केले आहेत. 'वीर ' हा शब्द सुद्धा सावरकर यांच्यापुढे कमी पडून नतमस्तक होतो ! इतक्या मरणप्राय यातनेतही शरीर आणि मनाची इतकी शक्ति त्यांनी कुठून आणली असेल? मातृभूसाठी आर्त कविता करण्याचे मनाचे हळवेपण कसे जपले असेल? गुलामीची तीव्र चीड आणि म्हणून मायभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे एक आणि एकच ध्येय उराशी बाळगून, अखंड भारताचे स्वप्न पाहण्याचे समर्थ धाडस आणि सशक्त प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केले.
खरा इतिहास आणि वास्तव समजून घेण्याची तयारी आणि इच्छा असणाऱ्यांनी, अनेक जणांच्या आयुष्याची होळी झाल्यामुळे आजचे आपले मिळालेले स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सर्वांनी , एकदा तरी हा सिनेमा अवश्य बघावा.
- स्वाती बापट
पुणे.