आज आम्ही रणदिप हुडा चा वीर सावरकर पाहीला. 👏👏👏 खूपच छान प्रदर्शन, सत्य घटना ,ज्या कारणास्तव झाकल्या जातात किंवा दुसर्या गोष्टी ज्यावर प्रकाश झोत पाडला जातो त्याच सर्व सामान्या ला माहीत होतात पण नेमक काय घडलं , कोण का आणी कस वागल ह्याच्या खोलात कुणी जात नाही कारण लोकांना आवडे पेलवेल एवढेच दाखवण्या पर्यंत काही जण जातात.
ज्यांनी ऐन तरुणाईत देशाच्या स्वातंत्र्याचे , सिन्धु ते सागर,अखंड भारताचे, स्वप्न पाहीले , एवढेच नव्हे तर २८ वर्ष कारागृहात राहून आपला आवाज हुकूमत गाजवणार्या ब्रिटिश सरकार पर्यन्त पोचवला, हिन्दूत्व काय ह्याची स्पष्ट समज करून देणारा, अहिंसा आणी मौन बाळगुन काही साध्य होणार नाही ह्याची पूर्ण जाणीव असणारा आणी सगळ्यांना करून देणारा एक प्रतिभावंत, क्रांतिकारी वीर विनायक दामोदर सावरकर , रणदिप हुडा ने एक निर्माता, दिग्दर्शन व नट म्हणून योग्य न्याय दिला आहे. खटकले ते संगीत दिगदर्शन पण नक्की नक्की पहा , सह कुटुम्ब सह परिवार पहा. सावरकरांवरील प्रेम द्विगुणित होईल🙏🙏
काळापाणी ची दृश्य पाहून अंगावर काटा आला. अश्या वेदना दायी परीस्थित कसे लिखाण केले 🤔🙏🙏🙏त्रिवार वंदन