समाज ज्या वास्तवावर पडदा टाकत आलाय तो पडदा काढायचं काम थोड्या प्रमाणात केलंय या चित्रपटाने..! एखादा मनुष्य किंवा समाज तसं का वागतो... त्याची कारणं दाखवली आहेत.. दिग्दर्शकाने मारी सेलवराज यांनी..! नायक कर्णन म्हणजे धनुष यांचा अभिनय एकदम दर्जेदार आहे.. प्रत्यक्षात ते वास्तव जगल्यासारखा अभिनय ही एक जमेची बाजू आहे. सगळ्या पात्रांच काम उत्कृष्ट आहे... आणि आणखी एक म्हणजे चित्रपटातील गाणी/ संगीत/ पार्श्वसंगीत.. एकदम हृदयस्पर्शी आहे.... पशु पक्षी कन्सेप्ट पण नमूद करण्यात आला कारण तो आहेच तसा. व्हिज्युअल मस्त आहेत, अभिनेत्री उत्तम दोन्हींच काम.