अत्यंत सुरेख हृदयस्पर्शी कथा !! शेवटपर्यंत प्रेक्षकांना मग्न करणारी आणि शेवटच्या क्षणी मनाला चटका लावून जाते अशी ही सुंदर रूपरेखा म्हणजे "आम्ही दोघी". प्रत्येक पिढीने आवर्जून पाहावा असा भावनिक चित्रपट.. ज्यांना भावना, माया, प्रेम, नाते म्हणजे फालतूपणा / बंधन वाटते त्यांनी तर अगदी नक्की पहाच किंवा तुमचा कोणी मित्र / मैत्रीण असा विचार करत असेल तर त्यांना तर "आम्ही दोघी" आग्रहाने दाखवा !! आपण नेहमीच बरोबर नसतो, आपण समोरच्या व्यकितचे पण बोलणे ऐकून घेतले पाहिजे, पूर्वग्रह दूषित विचार ठेवू नये, दुराग्रही बनू नये हे अगदी योग्य पद्धतीने पटवून देणारा चित्रपट ...