हिरो बनण्याचं स्वप्न उराशी बांधलेल्या लाखों शिवांना रूपेरी पडद्यावर झळकवण्याचं काम या चित्रपटाने केलं आहे. मायानगरी मुंबई मध्ये आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत आलेले कित्येक शिवा आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताना वास्तवाशी दोन हात करताना दिसतात.😌
काहीजण नियतीशी करार करतात.बदलू पाहतात आपल्या नशिबाला तर काही वास्तवाचा स्वीकार करतात.अनेकांना परिस्थीतीशी दोन हात करत वाढत चाललेल्या वयाशी तडजोड करणं शक्य होत नाही. छोट्याशा जीवनात खूप मोठे मोठे संघर्ष तेव्हा रोज करावे लागतात.अर्ध हा चित्रपट खूप काही अधोरेखित करून जातो.अत्यंत आवडलेला हा चित्रपट प्रत्येकाने बघण्यासारखा आहे.❣️🙏