एक सुंदर अनुभव !! ( भाग २ )
काय सांगते, काय दाखवते अन् काय बोध देते ही, ते सांगायचा हा थोडक्यात प्रयत्न !
* तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची व त्याच्या सामर्थ्यांची ओळख एकदा पटली की बाहेरील परिस्थितीचा फारसा फरक पडत नाही, ती ओलांडून तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी !
* तुमचे आनंदी व तुम्हाला अपेक्षित असलेले परिपूर्ण जीवन मिळवण्याचा व ते जगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे परमेश्वराने दिलेला, अन् तसे न जगणे ही त्याच्याशी प्रतारणा आहे !
* नायक असो वा नायिका,ही काही कोणा सामर्थ्यवानाची अथवा सौंदर्यवतींची मक्तेदारी नाही, तर एक सामान्य व्यक्तिसुध्दा तिच्या आयुष्याची नायिका किंवा नायक असते, बनू शकते अन् आपले आयुष्य बदलण्याचा व त्याला छान करायचा प्रयत्न नक्की करू शकते, अन् यासाठी प्रत्येक वेळ योग्यच आहे म्हणजे अगदी आत्ता सुद्धा !
राजीव जोगळेकर
कोथरूड, पुणे
९८९०५००५२५
🙏🏻🙏🏻🙏🏻