खूप अप्रतिम चित्रपट. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टी पाहताना खूप छान वाटलं. बाजोप्रभू देशपांडे, शिवा (हुबेहूब दिसणारे शिवराय) बहिर्जी नाईक,रायाजी,नेतोजी पालकर आणि संबंध बांदल सेना 🙏कोटी कोटी प्रणाम 🙏 अक्षरशः शत्रूही जळले असे पराक्रमी मराठे आपल्या मातीत जन्मले. अमेरिका ऑस्ट्रेलिया नाही पण आयुष्यात एकदा त्या पवनखिंडीमध्ये भेट द्यावी असे खूप वाटतेय आज.