खूपच सुंदर चित्रपट! कितीदाही पहिला तरी पुन्हा पाहावासा वाटतोच. हा एक बारामाही चित्रपट वाटला😄 पाहण्यासाठी वेळकाळ गरजेचा वाटतच नाही...
प्रत्येक पात्र आपला ठसा उमटवतो. Live-in सारखा पाश्चात्य मुद्दा अगदी अलगदपणाने मांडला आहे. यातले विनोद अगदी मजेशीर पद्धतीने सादर केले गेले आहेत, म्हणजे विनोद दर्जेदार असू शकतात याच उत्तम उदाहरण हा चित्रपट प्रस्थापित करतो. मराठी चित्रपट सृष्टी आजही भक्कमपणे उभी आहे, याला असे चित्रपट नक्कीच कारण असतात!