'न्यूड'मधला संघर्ष आता तीव्र झालाय.
जगण्याचाही आणि व्यक्त होण्याचाही.
ज्या काळात 'न्यूड'ची स्टोरी उभी राहते त्या काळात तो "बिनचपलेचा चित्रकार" भारतात होता. आणि त्याही काळात 'बडोद्या'तल्या शिकाऊ पोरांना मुंबईत येऊन 'मॉडेल' शोधावी लागत होती. स्वतःच्या सन्मानाची लढाई लढणा-या आईने पोराचं शिक्षण थांबायची वेळ आली तरी त्याला मदरश्यात जायला दिलेल्या नकाराचा हा काळ आहे.
'न्यूड' बारीक लक्ष देऊन बघा. अश्या अनेक जागा आहेत त्यात. 'ज्याच्या त्याच्या चिमटीतले अवकाश'.
आणि तेच निसटून चालल्याचा हा काळ आहे.
त्यामुळे "अश्या काळात" रवी जाधवने 'न्यूड' बनवला म्हणून त्याचं कौतुक. 'जे जे'मध्ये घुसलेल्या टोळ्या आता लोकांच्या किचनमध्ये घुसून खून करू लागल्या असताना 'न्यूड' बनवायची जोखीम रवीने उचलली आहे म्हणून त्याचं कौतुक !!
न्यूड नक्की बघा.
तुमच्या आमच्या भरवश्यावर कलाकार ही रिस्क घेत आहेत. आपण हा विश्वास प्राणपणाने जपायला हवा.