मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा हाती घेत एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धवसेना या पक्षांची मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठीची जागावाटपाची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरळीतपणे पार पडली आहे. जागावाटप करून उमेदवार निश्चित केल्यानंतर आता ठाकरे बंधूंकडून मुंबईकरांना दिला जाणारा वचननामा आणि सभांच्या नियोजनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरमधील महानगरपालिकांच्या क्षेत्रात होणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
Raj and Uddhav Thackeray's parties finalized seat-sharing for Mumbai elections. Their joint manifesto releases January 4th, followed by rallies across Mumbai and MMR. Sanjay Raut announced joint rallies in Mumbai, Thane, and Nashik.
#LokmatNews #MarathiNews #RajThackeray #UddhavThackeray