काल पूर्ण कुटुंबासमवेत पाहिला, लेकरांना स्वातंत्र्यवीर समजून सांगायचे होते, पण लेकरांना ते प्रत्यक्षात पहायला मिळाले (रणदिप हुड्डा) यांच्या अप्रतिम अभिनयाने, भूमिकेने.
देशातील राजकीय व्यवस्थेने देशाच्या खऱ्या नायकांना अंधारात ढकलून, चापलूस, स्व:हित जपणाऱ्या लोकांना नायक बनवून प्रस्तुत केल्याने आजची जातीनुसार नायक शोधण्याची प्रवृत्ती तेजीत आहे. त्याचा फटका देशाच्या अखंडतेला नक्कीच बसत आहे. ज्यांनी ज्यांनी ह्या देशासाठी प्राणाचे, जीवनाचे, जगण्याचे बलिदान दिलेले आहे, त्या त्या सर्व महान विभूतींच्या ऋणात आजचा प्रत्येक स्वतंत्र भारतीय आहे. ही भावना प्रत्येकाने मनात बाळगून राष्ट्रप्रथम हा भाव अंगीकारायला हवा.
जय हिंद!