या मालिकेच्या निर्माता दिग्दर्शक आणि लेखकांनी त्यांना जे करायचं होतं तेच केलं. शेवटी शालिनी या वाईट पात्राने गौरी जयदीप सहित अख्खं कुटुंब मारून टाकलं. मागील साडेतीन वर्षे ज्या शालिनीला शिर्के पाटील कुटुंबाने तोंड देऊन तिची कट कारस्थाने कधी जखमी होऊन तर कधी अर्धमेले होऊन उधळून लावली , त्या शालिनिनेच शेवटी शिर्के पाटील कुटुंबाला अतिशय क्रूरतेने संपविले. अशी कथा पुढे रेटणाऱ्या त्या निर्माता दिग्दर्शक लेखक आदी जणांची ही मनोवृत्ती समजण्या पलीकडे आहे. मला तर वाटतं हे सर्व मनोरुग्ण आहेत. कारण इतक्या खालच्या पातळीला जाऊन अजून कोणतीच मालिका सादर केली नव्हती.