अतिशय उत्कृष्टपणे चित्रपटाची कथा सादर केली आहे. सध्याच्या प्रत्येक तरूण पिढीने आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले कार्य आणि बलिदान हे खरंच प्रेरणादायी आहेत. रणदीप हुड्डा यांनी तात्याराव सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला पुरेपूर न्याय दिला आहे.