हसता हसता तूमच्या समवेत
दुःख सारे विसरलो आम्ही..
पोट धरून हसण्याचे आज
नवीन तंत्र जाणीले आम्ही..
'डॉ' असे ही औषध देतात
हे पहिल्यांदाच पाहिले आम्ही..
दवाखान्यात न जाऊन सुध्दा ही
ठणठणीत बरे होतोय आम्ही..
'भाऊ' मधल्या मावशीनेही
हसून हसून रडवले आम्हाला..
'कुशल' मधील कुशलतेने
नवीन जानी.... दाखवला आम्हाला...
'सागर' च्या पत्रांनी मात्र
जीवनात वास्तवाचे अंजन घातले..
'भारत'ने ही अ-बे, काय-बे, असे
नवीन शब्द शब्दकोशात आणले...
'श्रेया' ने ही दाखवून दिली
एक स्त्री पत्रकारितेची ताकत..
बाकी पुरुषांनच्या तोडीस तोड
अशी दाखविली तिनेही हिंमत...
'अंकुर'मध्येही फुटू लागलाय
विनोदाचा नवीन अंकुर..
'तुषार' सोबत वाद्यवृंदानी दिला
विनोदाला तुमच्या पक्का सूर..
अशीच विनोदाची हसरी हवा
आमच्या जीवनात बहरत राहू द्या..
सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातही
आनंदाची हसरी हवा येऊ द्या...
आनंदाची हसरी हवा येऊ द्या...
सौ.जान्हवी समीर चव्हाण
दि.०२/०९/२०१८
मुंबई