स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारकांचे मुकुट मणी तर होतच पण आत्मविस्मृत हिंदू समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. भयंकर हाल अपेष्टा सहन करून, स्वातंत्र्योत्तर काळात सरकार कडून झालेल्या अपमान आणि उपेक्षा सहन कराव्या लागल्या तरी सदैव समाजाच्या हितासाठी ते झटले. या चित्रपटात त्यांच्या जीवनाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न रणजीत हुडा यांनी केला आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तिने सहपरिवार पाहवा असाच हा चित्रपट आहे.