एक अतिशय उत्तम चित्रपट बनवल्याबद्दल हेमंत ढोमे आणि क्षिति जोग या जोडीच कौतुक आणि खूप खूप अभिनंदन
स्त्रियांची ट्रिप हा Plot असला तरी उगाच, कुठल्याही पात्राच्या प्रेमात पडून सिनेमा रुळ सोडू शकलाच असता, पण योग्य तेवढीच प्रत्येक पात्राबद्दल माहिती दाखवत गोष्ट / ट्रिप पुढे जात राहते
संवादातले पंचेस अतिशय बारिक बारिक निरिक्षण दाखवणारे आहेत, हेमत ढोमे यांच स्टोरी टेलिंग आवडणारं आहे, घोळ न घालता थेट पद्धतिनं तरीही दर्जा राखत सिनेमा पुढे जातो
सुहस जोशी आणि निर्मिती सावंत हा या सिनेमाचा USP म्हणावा , निर्मीती सांवंत यांच गदागदा हसण भयंकर संसर्गजन्य आहे, आपणही उगाच हसायला लागतो
सायली संजीवचा बिन्धास्त वावर , क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले यांचा संयत अभिनय
मस्त जमुन आलेली भट्टी, एकदा नाही पुन्हा पुन्हा बघावा वाटेल असा हा सिनेमा झाला आहे
सिद्धार्थ चांदेकर तर काय विचारायलाच नको। हा मुलगा अजून खूप चांगले सिनेमे करणार हे नक्की
ब-याच दिवसांनी थेटरमध्ये जाऊन बघीतल्यामुळे अजूनच जास्त आवडला ।