. चित्रपटामध्ये मध्ये नागराज अण्णांची पीएसआय ची धुवाधार ऍक्शन पाहून मी सरप्राईज झालो, ॲक्शन मध्ये डोळ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो की अण्णांनी असेच फक्त पोलिसांचेच रोल करावेत ,सयाजी शिंदे यांचा कमांडर चा रोल पूर्ण चित्रपट व्यापून जातो ,चित्रपटातील सयाजी शिंदे यांची भूमिका मराठी चित्रपट सृष्टीतील बेस्ट व्हिलनच्या रोलला नक्कीच क्वालिफाय होईल असे वाटते , संगीतामध्ये "गुण गुण" हे गाणं अतिशय छान पणे जमले आहे, त्याचे सादरीकरण आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्याशिवाय दुसरे कोणीच परिणामकारक करू शकले नसते .