सुंदर! अप्रतिम! हे शब्द सुद्धा अपुरे आहेत या फिल्म बद्दल बोलायला गेले तर. कारण इतके जबरदस्त सीन्स, स्टोरी, अँक्शन, डायलॉग सगळं .. सगळं काही जबरदस्त आहे की हे शब्द सुद्धा फिके पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हा किस्सा जो फक्त आपण चौथीच्या पुस्तकात फक्त वाचत आलो आणि इमॅजिन करण्याचा प्रयत्न करत आलो त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्कृष्ट असे काम या फिल्म मधील प्रत्येकाने केले आहे. मग ते कलाकार पडद्यावरचे असो अथवा पडद्या मगच. प्रत्येकाची मेहनत फक्त दिसतच नाही तर त्याचा अनुभव ही येतो. जेव्हा ती फिल्म आपण पाहत असतो तेव्हा इतके गुंग होऊन जातो की असे वाटते ते सगळे आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे. आपण ही त्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत. आपण ही त्याचा एक भाग आहोत. जेव्हा महाराज लाल महालात शिरून खानाला धडा शिकवतात तेव्हा गर्वाने कोणाची छाती फुगली नसेल तर नवलच. अभिमान वाटतो आपल्याला. नकळत रक्त सळसळते आणि जोरदार घोषणा आपोआप बाहेर पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो....