सगळ्या कसलेल्या अभिनेत्रीना एकाच वेळी पाहायला मिळणे हीच एक पर्वणी. केदार शिंदे तुझे अभिनंदन.
रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, आणि दीपा परब. अभिनंदन.
दीपा परब सोडली तर सगळ्या कसलेल्या अभिनेत्री, तिच्यावर दडपण येणे सहज शक्य होते, पण दीपा ने सगळ्यांना पुरेपूर असा अभिनय केला आहे.
रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी वंदना गुप्ते किती दिवसांनी एक समाधान मिळाले बघून.
सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर, तुम्ही या रे परत miss करतो आम्ही तुम्हाला अगदी मनापासून.
आणि दीपा आता तू एक bar सेट केला आहेस, डोन्ट लूक बॅक now.
केदार तुझे जास्त कौतुक, ह्या सगळ्या A K 47 ना घेऊन, एक कलाकृती साकारणे, म्हणजे तारेवरची कसरत. काही काही scenes तर इतके हळवे होते की डोळे पाणावले.
केदार तुझी मेहनत दिसली आणि मस्त रंगली गड्या.
नक्की पहा.
मी आईला जबरदस्ती घेऊन गेलो बघायला, आजकाल ती येत नाही बाहेर, आणि तिला लकी ड्रॉ मध्ये पैठणी मिळाली, ह्या पेक्षा अजून छान काय होऊ शकते.
बाई पण भारी देवा.