पोर्हिंतुगीज मोघल इंग्रज यासारख्या कित्येक परकीय आक्रमणांना तोंड देऊन हिंदवी स्वराज्य मिळविताना मराठा आर्मीला किती संकटाला तोंड द्यावे लागले असतील याची कल्पना ही करू शकत नाही , स्वराज्य मिळविण्यासाठी त्या काळी पेटून उठलेले मावळे आताच्या काळात मिळणे खूप मुश्कील ,पावनखिंड सिनेमा पाहताना क्षणोक्षणी याचीच जाणीव होते,बांदल सेना आणि वीर बाजीप्रभू देशपांडे सारख्या महाराजांशी आणि हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ असणाऱ्या अशा अनेक साहसी मराठा वीरांच्या साहसी कथा आणि त्यांचे कार्य मोठ्या पडद्यावर येणे गरजेचे आहे फक्त मराठी भाषा नाही तर हिंदी तमिळ तेलगु मलयालम गुजराती बंगाली इंग्रजी अशा सर्व भाषेत सिनेमाच डबिंग होणे खूप गरजेचे आहे जेणे करून अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव संपूर्ण जगाने केला पाहिजे ....
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय हिंद......