अतिशय वाईट संस्कार पसरवणारा मराठी कार्यक्रम.
सर्वप्रथम: शो ची जिंकणारी स्पर्धक मेघा ही काय लोकांसमोर आणते तेच कळलं नाही. प्रत्येक क्षणी खोटं बोलते, कसे बोलावे आणि वागावे हे माहीत नाही. ह्यावर महेश मांजरेकर बोलतात की मेघा शो ची जान आहे. लाज वाटली पाहिजे. आपण समाजाला काय देतोय? की जिंकण्यासाठी खोटं बोलावं? नाटकं करावी? खरंच कठीण आहे. असे वाटते, आपण मानुन घेतलय की सरळमार्गी कधी ध्येयापर्यंत पोहचता येत नाही.
दुसरं म्हणजे सई चे वागणे: ह्याआधी राजेश आणि रेशमाच्या वागण्याला लोकांनी भरपूर नावं ठेवली पण सई आणि पुष्कर चे वागणे सात्विक वाटले लोकांना.
बिग बॉस चे टास्क: बहुतेक टास्क हे एका विशिष्ट गटाला (सई, पुष्कर आणि मेघा) फेव्हरिट करणारे होते. तसेच महेश साहेब फक्त त्यांच्याबाजूने बोलताना आढळून आले. नेहमी बिग बॉस सांगत आले की टास्कमध्ये हिंसक होऊ नये पण ते टास्क तशेच बनवण्यात आले.
स्मिता खरंच तुझं कौतुक करावं असं वाटतं. सर्व टास्क छान पणे केलेस तसेच तुझं वागणे ही आदर्श होते.
मी कधी हिंदी किंवा कुठल्याही दुसरा बिग बॉस बघितला नाही. पण असे कार्यक्रम नक्की कुठले संस्कार पसरवतात हे मात्र समजले आहे. किंबहुना समाजाची विचारसरणी किती खालच्या दर्जाची आहे हे कळून येते.