मंत्रमुग्ध करणारा #मंत्र
खूप दिवसांनी चित्रपट पाहण्याचा योग आला. नवी आणि वेगळी कथा, नवी अभिनेते मंडळी अर्थात जुन्या अग्रज अभिनेत्यांच्या अदाकारीने रंगत जाणारा हा चित्रपट आपल्या मनाचा ठाव तर घेतोच पण सद्य परिस्थितीत आपल्याला पडणारृया अनेक प्रश्नांची उकल अत्यंत नाट्यमय रितीने करत राहतो. चित्रपट संपतो तो एक भलामोठा, सकारात्मक उपाय सांगूनच. चित्रपटाचा नायक निरंजन व नायिका अंतरा हे दोघेही जसे शेवटी एकमेकाची साथ सोडत नाहीत तसेच ते आपल्याही मनाची साथ सोडत नाहीत. नेहमी अतिउत्साहीत भूमिका करणारृया अभिनेता मनोज जोशीला या चित्रपटात संयमित भूमिकेत दिसण्यासाठी जितकी मेहनत घ्यावी लागली असेल किंबहुना त्यापेक्षा बरीच मेहनत दिग्दर्शकाने घेतली असणार. त्याच इतकं विचारी, हळव्या भूमिकेतील दर्शन सुखावून जात निश्चित. प्रत्येकाला विचारात खिळवून ठेवत मनाचा ठाव घेणारा चित्रपट म्हणजेच मंत्रमुग्ध करणारा #मंत्र#