ह्या सिनेमातील सर्वच कलाकारांनी खरंच इतके छान काम केलंय की बोलायला शब्द नाहीत. सिनेमा पाहिल्यानंतर स्टोरी लाईन आणि एक एक दमदार असे डायलॉग अगदी डोक्यात बसून राहिलेत..
हल्ली मराठी सिनेमा इंडस्ट्री अगदी बॉलीवूड ला टशन देणारे किती दर्जेदार सिनेमे काढत आहे बघायचं असेल तर मुळशी पॅटर्न बघा..
अगदी मराठी सिनेमे बॉलिवूड सृष्टीच्या ही नजरेत भरू लागले आहेत..
याच उत्तम उदाहरण सैराट नंतर धडक आणि आता लवकरच सलमान खान रिमेक बनवतोय ह्या सिनेमाचा !