नाच ग घुमा , हा चित्रपट पहिल्या दिवशीच (उद्घाटनाच्या दिवशी ) पाहिला . बरोबर बायको ,मुलगी , सासू व सासरेबुवा हे सर्व घरातील मंडळी होतीच. परेश मोकाशी व मधुगंधा मोकाशी यांची मूळ कथाबीज डोळ्यासमोर ठेवून पटकथा लिहिण्याची व दिग्दर्शन करण्याची एक विशीष्ट शैली / पध्दत आहे. ती या ही चित्रपटातून जाणवते. अवघड व गम्भीर विषय त्याचे मूळ हरवू न देता खुसखुशीत पणे सादर करणे व त्याबरोबर च त्या विषयाचे गांभिर्य सर्वे स्तरातील प्रेक्षकाना पटवून देणे हे यात अचूक जमले आहे व तेच या चित्रपटाच्या यशाचे रहस्य आहे. सर्व कलाकारांनी छानच काम करून आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. खासकरून मुक्ता व नम्रता यांचा अभिनय सुंदर आहे . बाकी प्रोडक्शन टीम ने छान काम केले आहे.
पहिल्या दिवशी शो झाल्यावर स्वप्नील जोशी व परेश च्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून केलेले आभार प्रदर्शन व जाहिरात , नाच ही छान होते...माझ्या मुलीने त्याचा खूप आनंद घेतला...
पण पटकथेत एक सूक्ष्म पैलू राहून गेला आहे वा सुटला आहे असे मला वाटते..
तो कोणता हे मी इथे नमूद करू इच्छित नाही . त्याकरता प्रोडक्शन टीम चा नम्बर वा इमेल मिळाला तर बरे होईल.
हेमंत नानजकर
७२१९४४४९२९