कलर्स मराठी चॅनेल वर " जय जय स्वामी समर्थ " ही मालिका सुरू झाली तेव्हा खूप उत्सुकता होती.
स्वामींचे भक्त असल्याने मोठ्या श्रद्धेने पहिले 2, 3 एपिसोडस पाहिले खरे परंतु पूर्ण पणे भ्रमनिरास झाला. 🙁
स्वामींचे character फारंच अतिरंजित रित्या रेखाटले आहे.
माझे स्वामींविषयी जे काही थोडेफार ज्ञान आहे त्याप्रमाणे स्वामी कधीच असे वागले नव्हते.
स्वामींची भूमिका साकारणारे पात्र आरडाओरडा काय करते, विचित्र हातवारे/हावभाव काय करते, इतर लोकांवर किंचाळते काय, लोकांना शाप काय देते, सर्वच अनाकलनीय आणि भक्तांना न पाहवणारे आणि न पटणारे आहे. कितीतरी प्रसंग सुद्धा काल्पनिक आणि dramatization साठी घुसडले ले दिसतात. 🤔🙄
ह्या मालिकेच्या निर्मात्याने, दिग्दर्शकाने कुठून संदर्भ/रेफरेंसेस घेतले आहेत देव जाणे.
लोकांच्या श्रद्धास्थाना ला आणि भक्ती ला ठेंच पोहोचेल अशा मालिका प्रदर्शित करण्याचे धाडस अशा चॅनेल वाल्यांना कसे होते हेच कळत नाही. 😡
सर्व स्वामी भक्तांना माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या मालिकेचे प्रदर्शन बंद पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत.
ह्या मालिकेच्या निर्माता आणि दिग्दर्शकाचा त्रिवार धिक्कार आणि निषेध. 😡😡😡