अपार धैर्य, आत्मसंयमन, न्यायप्रियता
तसेच सूज्ञता व शहाणपण
संपूर्ण चांगुलपणा व मानवी सद्गुणांचा सर्वोच्च दर्जा
विकसित कसा करायचा, याचे स्पष्ट आणि प्रेरणादायी मार्गदर्शन!
- रॉबर्ट ग्रीन, ‘मास्टरी’ या ग्रंथाचा लेखक
धैर्य कशाासाठी, तर अडथळ्यांवर मात करण्यासाठी,
जे योग्य आहे, न्याय्य आहे, त्यासाठी प्राणपणाने लढा देण्यासाठी, स्वेतर लोकांची वेदना, आपल्या स्पर्शाने हलकी करण्यासाठी,
स्वतः बरोबरच अवतीभोवतीच्या जगतात
संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी!
धैर्य ही सवार्थाने सक्षम ऊर्जामयी शक्ती आहे.
धैर्याची हाक वेळीच ऐका आणि त्याला योग्य तो प्रतिसाद द्या!
तुमचा आस्थेचा-जिव्हाळ्याचा प्रांत आणि धैर्याने केलेली प्रत्यक्ष कृती
यांच्या समन्वयातून आपल्याला मोठे यशवैभव प्राप्त होत असते.
हेतूपूर्ण व ध्यासमग्न जीवनप्रवासाचा सुरेख प्रेरणादायी आराखडा!
जनरल जिम मॅटीस, यू.एस. मरीन्स (रिटायर्ड)
धैर्याची वस्त्रे परिधान करा!
मग तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त काही मिळेल, हे नक्की!
जॉर्ज रेव्हलिंग