छान आहे, आवडला!!
‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट खूप काही सांगून जातो..एक हुशार मुलगा एका कठीण प्रसंगाने आत्मविश्वास गमावतो. पण त्याचं कुटुंब आणि मित्र त्याचा तो आत्मविश्वास पुन्हा परत कसा मिळवून देतात याचा हा प्रवास आहे आणि सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
सर्व नवीन तरुण कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. मुकुंद, रोहीत, सचिन यांची मैत्री, त्यात सचिनचे मिश्किल, खोडकर संवाद नक्कीच छाप पाडतात.
मुकुंद आणि अमृताची प्रेम कहाणी छान रंगवली आहे. ‘लाइफ म्हणजे गोंधळ नुसता’ हे गाणे आणि संगीत अप्रतिम आहे.
एक वेगळा अनुभव, नक्की पहा!