ही पार्वती आणि तिच्या कुटुंबाची कहाणी.कर्तृत्वहीन पती लाभलेल्या अनेक स्त्रियांच्या दुर्दैवाची ही प्रातिनिधिक नायिका म्हणून पार्वती कडे पाहता येईल.आपल्या संसाराचा गाडा रूळावर आणण्यासाठी केलेली धडपड आणि त्यात आलेले अपयश यांचे चित्रण करणारी लक्षवेधी कादंबरी.ग्रामीण जीवनाचे प्रत्ययकारी पट उभा करण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी झाली आहे.या ग्रामीण स्त्रियांची प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती वाचकांना विचार करायला भाग पाडते.मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय कादंबरी.