पानीपत आज पानीपत पाहीला जो विचार केला होता त्याप्रमाणे भव्य, अप्रतिम आहे. सदाशीव भाऊ, विश्वास राव यांचे शौर्य दाखवण्यात गोवारीकर कुठेही कमी पडत नाही. बर्याच दिवसांनी रवींद्र महाजनी हे मल्हार राव होळकरांच्या भुमीकेत दिसतात. अर्जून कपुरने सदाशिव भाऊंच्या पात्रास न्याय दिला आहे. संजय दत्त ने ही अब्दाली उत्तम रीतीने साकारला आहे. एकदा आवर्जून पहावा असा चित्रपट.