#Watchlist
Drishyam 2 (2021)
दृश्यमच्या पहिला भाग जेव्हा २०१३ साली आलेला तेव्हा मळ्याळमसह सर्व भाषेतील प्रेक्षकांना तो आवडला होता. त्याचा दुसरा भाग येणार म्हटल्यावर उत्सुकता होती. मर्डर मिस्ट्री चित्रपटाचा सिक्वेल पहिल्या भागा इतकाच थ्रीलर करण्याचे श्रेय दिग्दर्शक आणि लेखक जितू जोसेफ (Jeethu Joseph ) यांना दिले पाहिजे.
मोहनलाल (Mohanlal) यांना अभिनयात आता आणखी काही सिद्ध करण्याची गरज नाही. तरी देखील या चित्रपटात त्यांनी ते भारतातील सर्वोत्तम अभिनेता आहेत हे दाखवून दिले. चित्रपटात मोहनलालवर सर्वांचा फोकस होता. त्याच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पण दृश्यम एक आणि दोन या दोन्ही यशाचे सर्वात जास्त क्रेडिट दिले पाहिजे ते लेखक आणि दिग्दर्शक जितू जोसेफ यांचे. अगदी मोहनलालच्या भाषेत सांगायचे तर Criminal डोक्याचा दिग्दर्शक.
मर्डर मिस्ट्री चित्रपटात असलेला सर्व मसाला, सस्पेंस दृश्यममध्ये आहेच. त्यात भर पडते ती मोहनलालच्या अभिनयाची. पहिला एक तास प्रेक्षकांचे पेशन्स चेक करतो. पहिल्या भागानंतरची आणि शेवटासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लेखकाने बराच वेळ घेतलाय, या शिवाय दृश्यम मध्ये कोणताही दोष नाही. जितू जोसेफमधील दिग्दर्शक आणि लेखकाचे कौतुक करावे तितके कमीच. अखेरच्या २०-२५ मिनिटपर्यंत कथेमधील सस्पेंस कुठेही लक्षात देणार नाही अशा पद्धतीने कथेची मांडणी त्यांनी केली आहे. विशेषत: कथेमधील बारकाव्यांमुळे चित्रपट कोणत्यातरी ग्रहीतकावर सुरू आहे, असे वाटत नाही.
मळ्याळम भाषेतील हा चित्रपट इंग्रजीसह टायटल्समध्ये Prime Video उपलब्ध आहे. मळ्याळम भाषा कळत असेल तर संवादातील लेखकाची ताकद अनुभवता येईल.