निश्चितच हा शो एक नंबरचा आहे. अन्य वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांना हास्य जत्रेने केंव्हाच मागे टाकले आहे. मात्र भाषेविषयी काही चुका निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. प्राजक्ता माळीने सर्वांना गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. वास्तविक ते मराठी नव वर्ष नसून हिंदू नव वर्ष असते. तेच नववर्ष गुजराथी, हिंदी, तमिळ, तेलगु वगैरे अन्य भाषिक लोकही साजरे करतात.
दुसरे असे कि अनेक कलाकार, विशेषतः प्रसाद खांडेकर आलेलो,, गेलेलो, अशी भाषा वापरतात. आलो होतो, गेलो होतो अशी भाषा वापरायला हवी. आम्हाला वाटले होते कि प्रसाद ओक तिथे असल्यानंतर अशा चुका होणार नाहीत. तेंव्हा सर्वांनी काळजी घ्यावयास हवी. बाकी सर्वांना शुभेच्छा.