नाळ चित्रपट:
सुधाकर रेड्डी दिग्दर्शित नाळ चित्रपट हा लहानग्या चैतन्य चे भावविश्व प्रकट करतो. महाराष्ट्रातील दूरच्या खेड्यातील विश्व आणि ग्रामीण लोकजीवन हे निसर्गरम्य वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने कॅमेराने टिपलं आहे. अनुभवी नागराज मंजुळे चे एक मुख्य पात्र म्हणून (चैतु चे वडील)अनुभवास आले. चित्रपटाची कथा फार उच्च नसली तरी लहान मुलांच्या विश्वाचे आणि विशेषतः दत्तक घेतलेल्या चैतूच्या मनातील अस्तब्धता निर्माण झाली ती खऱ्या आईच्या ओढीमुळे. कॅलिडोस्कोप चा आणि दारातील मृत वासरू चा अतिशय सुंदर रूपक म्हणून वापर केला आहे. कॅलिडोस्कोप हे एक आकर्षण व चैतूचे दिवास्वप्न दर्शवते. बालकलाकार म्हणून चैतूची भूमिका आणि त्याचे त्याच्या आजीसोबतचे नातेसंबंध लक्षणीय आहे. एकूणच प्रेक्षकांना फक्त चैतूचीच नव्हे तर त्याच्या अवतीभवतीच्या सर्व लोकांची नाळ ही एकत्रितपणे अनुभवयास मिळते.
Review: Aniket Bhosale