अतिशय सिंपल, भावनाप्रधान पण सद्यस्थितीतील प्रश्नावर प्रॅक्टिकल विचार करायला लावणारा सिनेमा. एकही स्त्री पात्र नाही, फारशी गाणी नाहीत, भव्य व बदलणारे सेट्स नाहीत मग आहे काय तर सुंदर व मनाला भिडणारे संवाद, अमिताभ व ऋषिकपूर यांचा संयत व सहजसुंदर अभिनय, संवाद.इतक्या साधेपणा ने अतिशय उत्तम सिनेमा निघू शकतो कारण खऱ्या हिऱ्याला सजवण्यासाठी कृत्रिम सजावटीची गरज नसते , सिनेमा अतिशय आवडला, जरूर पहायला हवा असाच आहे हा सिनेमा.