पूर्वी हा कार्यक्रम बघायला फार आवडायचे, पण त्याच-त्याच प्रकारचे चाळे बघून आता उबग यायला लागलाय. पुरुष कलाकारांना वारंवार स्त्री वेषात दाखवणे, कलाकारांचे अशोभनीय संवाद, आलेल्या पाहुण्यांना मारलेले टोमणे हे या कार्यक्रमातील नाविन्य संपल्याचेच द्योतक आहे. सबब हा कार्यक्रम बंद करुन त्याऐवजी दुसरा एखादा नविन हास्य कार्यक्रम चालू करावा.