माणूस आपल्या आरोग्याचा उपयोग जेव्हा इतरांच्या भल्यासाठी करतो, तेव्हा त्या आरोग्याला "योग्य आरोग्य" म्हणतात अन् याचा आधारस्तंभ आहे "स्वास्थ्य त्रिकोण"!!! तन, मन आणि ऊर्जा यांची एकरुपता म्हणजेच स्वास्थ्य. मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक स्वास्थ्याचे M.S.Y (भोजन, निद्रा, योग) हे तीन कोन आहेत. पण बरेचदा आपण शारीरिक आणि मानसिक (?) आरोग्यापलीकडे विचार करतच नाही स्वास्थ्याचा. या पुस्तकामुळे मला समजले की कंजुषपणे वागुन आपण पैसा साठवला तर तो शेवटी आपल्या ईलाजातच खर्च होतो, परंतु याच पैशाचा ऊपयोग स्वतःच्या "योग्य आरोग्य"प्राप्तीसाठी केल्यास पैसा सतत "वृद्धिंगत" होतो. सामाजिक अस्वास्थ्याची कारणेच नव्हे तर या सोबतच या स्वास्थ्याच्या पुनःप्राप्ती बद्दल सुरेख विवेचन केलेले आहे या पुस्तकात.
या पाचही प्रकारच्या स्वास्थ्याचे महत्त्व आणि एकमेकांशी असलेले संबंध जाणुन घेण्यासाठी तेजज्ञान फाऊंडेशन प्रकाशित "स्वास्थ्य त्रिकोण" हे पुस्तक नक्की वाचावे.