*****
"गुलाबजाम"
चित्रपटाची खुप सुंदर मांडणी केलीय , जणू पौष्टिक रूचकर पदार्थांची मांडणी करून पंगतीला लावलेल पाणं.
हे सर्व पाहताना नकळत तोडांला पाणी सुटल्या शिवाय आणि क्या बात है.. ! असे शब्द तोडून निघल्या वाचून राहत नाही.
चित्रपटाची फोडणी एवढी उत्तम आहे की आपल्याला गोड, तिखट, तुरट, खारटं, आंबट, असा प्रत्येक अनुभव देतात.
मात्र पाणचट किंवा कडवटपणा कुठेच नाही.
घरच्या सर्व आई, आजी, ताई सोबत एकत्र पहावा असा सस्मरणीय सुंदर गुलाबजाम चित्रपट..!
~जितेंद्र बंदसोडे.