छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळयात जवळचे आणि त्यांचे चांगले मित्र नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे. नुसत्या ह्या नावाने मुघलांना घाम फुटायचा.अशा वेळी छत्रपतींनी कोंढाण्याची जबाबदारी तानाजींवर दिली,आणि त्यांनी ही मोहीम फत्ते केल्या शिवाय चेहरा दाखवणार नाही हा शब्द तानाजींनी छत्रपतींना दिला. त्याच काळात तानाजींचे पुत्र यांचा विवाह असतो म्हणून महाराज त्यांना ह्या मोहीमेत जाऊ नये असे सांगतात. पण बोलतात ना कि प्रत्येक मराठा वेडा आहे,...स्वराज्याचा,छत्रपती शिवाजी महाराजांचा, भगव्याचा तसेच आपले तानाजी मालूसरे त्यांनी महाराजांना सांगितले आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असे बोलून मालूसरे कोंढाणा काबीज करण्यासाठी कोंढाण्यावर कडाडले. स्वताःचा प्राणांची आहुती देऊन नरवीर तानाजी मालूसरेनी कोंढाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकवला.आणि आपला प्राण सोडला. त्या दिवशी रयतेचे पोशिंदे छत्रपती महाराजांना अश्रू अनावर झाले.एक जवळचा मित्र एक महान योद्धा स्वराज्याला सोडून गेला. म्हणून ह्या दुःखात महाराजांच्या मुखातून उदगार येतात,..... "गड आला पण माझा सिंह गेला". आणि म्हणून कोंढाण्यास आपण आताचा सिंहगड म्हणून ओळखतो. मराठ्यांच्या अशा शूर योद्ध्यावर चित्रपट प्रदर्शित केल्याबद्दल मी अजय देवगन व त्यांचा पुर्ण टीम चा आभारी आहे. आपल्या मुळे पुर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर योद्ध्यांचा इतिहास अवगत होतोय, असच पुढे देखील आपले कार्य सुरू राहो हीच आईभवानी चरणी प्रार्थना. 🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...🚩🙏🚩