कॉलेज डायरी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता चित्रपटाची गोष्ट ही दोन कॉलेज तरुणांच्या जीवनावर होती. चित्रपट प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीनं चित्रपटाला प्रतिसाद दिला. कलाकारांनी चित्रपटामध्ये केलेलं काम हे बघण्यासारखं होत त्याचप्रमाणे दिग्दर्शकाची मेहनत, दोन तरुण मुलांनी पाहिलेलं स्वप्न आज अर्धवट राहील आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार सात्यत्याने घडत आहे. आपल्या भावी आयुष्याची सुरवात करणाऱ्या दिग्दर्शकांना चित्रपटांचे वितरक फसवून मराठी चित्रपट पाडू लागले आहेत या आधी ही अशा अनेक मराठी चित्रपटांचा बाबतीत हाच प्रकार झालेला आहे मात्र याबाबत कोणी बोलले नाही
चित्रपटाच्या कलाकारांनी स्वतःची मेहनत गहाण ठेवून कोटीच्या घरात जाऊन आपले घरदार विकून जमीन विकून स्वतःचा व्यवसाय सुरु करायच्या उद्देशाने हे पाऊल उचल होत पण अशा हरामखोर वितरकांमुळे नविन तरुण पिढी ही त्यांना बळी पडत आहे आणि चित्रपटांचा व्यवसाय होत नाही. हे सध्यस्थिती मध्ये जास्त प्रमाणात चालू आहे. हे कुठे तरी थांबलं पाहिजे,यावर चित्रपट महामंडळ यांनी लक्ष दयाला हवं.
घडल्या प्रकरणी वितरकांवर कठोर कारवाई होऊन नुकसान भरपाई देण्याचे लिहून घ्यावे. त्याचप्रमाणे तरुण चित्रपट निर्मात्यांना सपोर्ट करावा. अशी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या तरुण मुलांची इच्छा आहे, न्याय झालाच पाहिजे.
साईनाथ डोळे -चित्रपट समीक्षक