,"नाळ " अप्रतिम मराठी चित्रपट. नागराज मंजुळे आता दिग्दर्शक म्हणून परिपक्व झालेत. लीक से हटकर अस जे त्यांच वैशिष्ट्य आहे, ते त्यांनी कायम ठेवल. भंडारा जिल्हा, वैनगंगा परिसर व ग्रामीण मराठी बोली हे सर्व आम्हा विदर्भातील लोकांसाठी बोनस आहे. एक आठ- दहा वर्षे वयाचा मुलगा त्याचे आई बाबा व आजी अस सुखी ग्रामीण कुटुंम्ब. एक दिवस दुरच्या गावातून त्याचा मामा येतो व तो सांगतो कि ही त्याची खरी आई नाही. खरी आई दूर गावाला असते. न पाहिलेल्या आई विषयीची ओढ, तिच्या भेटीसाठी आसुसलेला तो लहानगा जीव व त्याच्या मनाची होणारी घालमेल, काय सूंदर चित्रण झालं आहे म्हणून सांगू, मला तर वाटते या वर्षीचा national अवार्ड नक्कीच नाळ जिंकणार. श्याम बेनेगल चे सत्तर च्या दशकातील चित्रपटाची मराठी आवृत्ती चाच भास होतो.
माझेकडून *****