व्यक्ती आणि वल्ली
हे पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. लेखक पुरुषोत्तम देशपांडे यांनी २० वर्षांत हे उत्कृष्ट पुस्तक लिहिले. मी या पुस्तकाची ५ वी आवृत्ती वाचली.
लेखकाने या पुस्तकात एकूण २० पाठ लिहिले आहेत. प्रत्येक पाठात त्या व्यक्तीचा स्वभाव, भावना, वर्तन आणि लेखक आणि व्यक्तीमधले संभाषण आणि त्या व्यक्तीचा संपूर्ण जीवन प्रवास सांगितला आहे.
लेखकाने खूप सुंदर लिहिले आहे. लेखकाने खुप उत्तम रित्या पात्रे बनवली, जणु आपल्या समोर जिवंतच केली. नवशिक्या लेखकांनी पुस्तक कसे लिहायचे ते, हे पुस्तक शिकवते. एखादे पात्र कसे तयार करावे आणि कसे विकसित करावे, हे पुल कडून नक्कीच शिकण्यासारखे आहे. मला सर्व कथा आवडल्या. पण "सखाराम गटाणे" सर्वात अधिक पसंत आली.
खूप मजेदार, कधीकधी थोडे भावनिक, उत्तम पुस्तक. हे पुस्तक आॅडिओ स्वरुपात पुल च्या आवाजात YouTube वर उपलब्ध आहे. कृपया वाचा किंवा ऐका. तुम्हाला नक्कीच माझ्यासारखा चांगला अनुभव मिळेल.