नाळ सिनेमा बघितला आणि लहानपणाची आठवण झाली,
खर तर हा सिनेमा ज्या ठिकाणी शूट झाला त्या जिल्ह्यात माझे बालपण गेले, त्यामुळे सिनेमा मधली भाषा, दाखवलेले गाव, घर, घरासमोरच अंगण, घरातला कूलर, बैलगाडी, विटी दांडू, शेत, टमटम (ऑटो रिक्षा), नदी...
अगदी मागचा १० - १५ वर्षाचा काळ सहज उलटून गेला.
चैतू ने खूप अप्रतिम अभिनय केला आहे, त्याच निरागस हास्य आई साठी असणारी तळमळ, खट्याळ स्वभाव सगळच,
आणि ज्या पद्धतीने एका आई आणि मुलाच्या बाबतीत जे नाते दाखविण्यात आले आहे, ते खूप कमाल आहे,
आणि आजी ने पण जी भूमिका केली ते बघून मला माझ्या आजी ची आठवण झाली,
खूपच सुंदर, अप्रतिम सिनेमा. आणि cinematography पण खूप आवडली.
असेच सिनेमा बनवत रहा. नागराज मंजुळे आणि सुधाकर रेड्डी यांचे खूप खूप अभिनंदन.