प्रत्येक माणूस हा त्याच्या बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठा होतो. समज ही प्रत्येक माणसाला असते. आपल्याला एखादी गोष्ट समजते की नाही हे आपल्या वयानुसार नाही तर आपल्याला ती गोष्ट समजून घेण्याची इच्छा आहे का यावर ठरते, उदाहरणार्थ शकू, तानी ची धाकटी बहीण, तिच्या पेक्षा वयाने लहान पण घराची बेताची परिस्थिती आहे म्हणून आजारी असून सुद्धा ती बरी असल्याचं सांगते.
तानी कोणाच्या उपकार न घेता स्वतः च्या मेहनतीने मोठी होती जशी की मेहनतीने कमावलेले पैसे घेते पण मदत म्हणून दिलेले नाही.
तानी ही गोष्ट आहे एका मुलीची जी खडतर परिस्थिती आणि येणाऱ्या संकटांवर जिद्दीने, धैर्याने मात करते आणि यशस्वी होते.