नाच गं घुमा
पुन्हा एक feel good चित्रपट. दर्जेदार. चित्रपटाला उंच दर्जा आलाय तो फक्त चांगला विषय (नोकरी करणारी स्त्री व कामवाली बाई यांचं मेट्रिक्स) व या विषयाची सुंदर हाताळणी नव्हे तर मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव या दोघींचा सहजसुंदर अभिनय. विशेषत: नम्रताची कामवाली बाई. मी गेली दोन तीन वर्षं या अभिनेत्रीला “महाराष्ट्राची हास्यजत्रा” पहात आलोय. तीची versatility (चतुरस्रता) is simply amazing. हास्यजत्रेत किती वेगवेगळ्या रोल्समध्ये मी नम्रताला पाह्यलंय आणि प्रत्येक रोल मध्ये ती परफेक्ट फिट बसायची. मी हा चित्रपट पहाण्याचं मुख्या कारण ती. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावरचं तीचं मोठ्या भुमिकेततलं आगमन मला पहायचं होतं.
भाऊ पाध्ये (वासुनाका चे लेखक) ने तनुजाचं वर्णन “गेल्या दहा हजार वर्षांत अशी नटी झाली नव्हती” असं काहीतरी केलं होतं, ते आठवलं. अतिशयोक्ती हा भाषेचा एक अलंकार असतो.
नम्रताची अभिनयांतली चतुरस्रता ही असामान्य आहे. हिंदी पडद्यावर मला अशी चतुरस्रता फक्त नवाजुद्दीन सिद्दिकी त दिसलीय आतापर्यंत. त्याचे काही चित्रपट पाहिलेले असुन देखिल नंतरच्या एका चित्रपटांत शेवटपर्यंत त्याला मी ओळखलं नव्हतं.
नम्रता याच कॅटेगरीतली.
चित्रपट संपतो तो शिर्षक गाण्यावरच्या सांधिक नृत्यात. खरं म्हणजे या आधीच चित्रपट संपलेला असतो कारण सगळी पात्रं दिसतात ती नविन कोऱ्या वेषांत, चित्रपटांतल्या वेशभुषेत नाही. हे स्थित्यंतर विशेषत: जाणवतं ते नम्रता च्या बाबतीत. सगळी पात्र नाचतांत ती एका झिंगेत.
या चित्रपटाचा feel good effect हे नृत्यदृश्य पहातांना येतो, almost तो अंगावर येतो व आपल्यालाही वाटतं त्या सर्वांना जॅाईन व्हावं!